म्हसळा : प्रतिनिधी
येथील नगरपंचायतीच्या 12 प्रभागातील 4978पैकी 3410 मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1765 महिला तर 1645 पुरुष मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. 5मध्ये (59.1 टक्के) झाले. तेथे 509पैकी 301 मतदारांनी मतदान केले. तर सर्वात जास्त मतदान प्रभाग क्र.17मध्ये (81.2 टक्के) झाले. तेथे 392 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
म्हसळा नगरपंचायतीच्या 2, 7, 8, 9 या चार प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तर प्रभाग क्र. 4मधून सरोज मंगेश म्हशीलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी 12 प्रभागात मतदान घेण्यात आले.