Breaking News

अवैध, अवजड वाहतूक बंद करा

मनसेचा पालीत जनआक्रोश मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

पाली : प्रतिनिधी

अष्टविनायक क्षेत्रांपैकी पाली शहरातील अवैध व अवजड वाहतूक सर्वात गंभीर समस्या बनली आहे. येथील अवैध वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (दि. 24) पालीमध्ये  जन आक्रोश मोर्चा काढला होता.

पालीतील अवैध व अवजड वाहतूकी विरोधात सुधागड मनसेच्या वतीने गुरुवारी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी बल्लाळेश्वर मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. ‘सुधागड नवनिर्माण सेनेचा नवा निर्धार, अवैध वाहतूक करणार हद्दपार‘, ‘बंद करा, बंद करा अवैध वाहतूक बंद करा‘ अशा घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. येत्या आठ दिवसात पाली शहरातील अवैध व अवजड वाहतूक बंद झाली नाही तर रायगड़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा  मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी या वेळी दिला.

आता आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून आमची भावना व्यक्त केली आहे, यापुढील मोर्चा मनसे स्टाइलने उग्र स्वरूपात होईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशारा मनसे महिला जिल्हा सचिव लताताई कळंबे यांनी दिला.

या वेळी तहसीलदार उत्तम कुंभार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन स्वीकारून उपरोक्त मागणीच्या संदर्भात पाली नगरपंचायत विभागाला पत्रव्यवहार व चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही तहसीलदार कुंभार यांनी दिली.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, लताताई कळंबे, सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे, तालुका उपाध्यक्ष अजय अधिकारी, तालुका सचिव तेजेश परबलकर, शहर अध्यक्ष दीपेश लहाने, मनविसेचे तालुका अध्यक्ष भावेश बेलोसे, पाली शहर अध्यक्ष अजिंक्य पाशीलकर, सचिव प्रतीक आंग्रे, जांभूळपाडा विभाग अध्यक्ष शेखर चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply