Breaking News

‘दिशा’च्या निलम आंधळे यांनी केला बेघर मुलांबरोबर वाढदिवस साजरा

पनवेल : वार्ताहर

दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम विकास आंधळे यांनी कळंबोली उड्डाणपुलाखाली भरणार्‍या शाळेत जाऊन तेथील बिनभिंतीच्या शाळेमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. प्रत्येक व्यक्ती समाजशील असल्याने त्यातून उतराई होण्याकरिता पुढे येण्याची गरज आहे. त्याच भावनेतून कामोठे येथील निलम आंधळे काम करतात. 17 डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. सर्व गोष्टींना फाटा देत त्यांनी कळंबोली पुलाखाली भरणार्‍या बिनभिंतींच्या शाळेत जाऊन तेथील मुलामुलींसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. मुला-मुलींसोबत केक कापून त्यांना खाऊचे वाटप केले. यानिमित्ताने बिनभितींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी धम्माल केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply