Breaking News

डिझेल परताव्यासाठी मच्छीमार आक्रमक

विराट मोर्चाची मुरूडमध्ये तयारी

मुरूड : प्रतिनिधी

गेल्या अडीच वर्षात डिझेल परताव्याची रक्कम न मिळल्यामुळे मच्छिमार सोसायट्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. डिझेल परताव्याची रक्कम त्वरीत मिळावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील मच्छीमार मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

मुरुड तालुक्यात लहान व मोठ्या अशा सातशेपेक्षा जास्त होड्या मच्छिमारी करीत आहेत. मच्छिमार सोसायटीमधून या होड्यांना माफक दरात डिझेल पुरवठा केला जातो. या सोसायट्यांना शासनाकडून डिझेल परतावा मिळतो. त्यासाठी जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांनी सहाय्य्क मत्स्य विकास अधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षात डिझेल परताव्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे मच्छिमार सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. डिझेल परतावा त्वरित मिळावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी मुरूडमधील मच्छिमार करीत आहेत.

2021 हे वर्ष संपत आले तरी डिझेल परतावा रक्कम मिळाली नाही. त्यामुळे मुरूड कोळीवाड्यांसह रायगड जिल्ह्यातील सर्व मच्छिमार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. डिझेल परतावा मिळावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी ते विराट मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

-मनोहर मकू, उपाध्यक्ष, सागर कन्या मच्छीमार सोसायटी मुरूड

दहा दिवसापूर्वीच डिझेल परतावा देण्यासाठी तीन कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. परंतु हे पैसे कशा पद्धतीने वाटप करावयाचे याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त होताच त्याचे तातडीने वाटप करण्यात येईल.

-सुरेश भारती, मत्स्यव्यवसाय उपायुक्त, रायगड जिल्हा

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply