Breaking News

आयपीएलमध्ये नेहरा अहमदाबादचा प्रशिक्षक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी अहमदाबाद या नव्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी या संघाचे संचालकपद सांभाळतील. भारताला विश्वविजेतेपदाची दिशा दाखवणारे दक्षिण आफ्रिकन गॅरी कर्स्टन या संघाचे प्रेरक म्हणून सूत्रे स्वीकारण्याची चिन्हे आहेत. यासंबंधी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. नेहराने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मार्गदर्शन केले असून कर्स्टन यांनाही आयपीएलमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांची भर पडणार असून एप्रिल-मे महिन्यात भारतातच आयपीएलचे आयोजन करण्यात येऊ शकते. गतवर्षी कोरोनामुळे आयपीएलचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीत खेळविण्यात आला होता. लखनऊ आणि अहमदाबाद या नव्या संघांना फेब्रुवारीत होणार्‍या लिलावप्रक्रियेपूर्वी प्रत्येकी तीन खेळाडूंना निवडण्याची संधी आहे.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply