पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी गुरुवारी (दि. 13) कोल्ही कोपर येथे भूमिपुत्रांची निर्धार परिषद आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जाहीर केल्याप्रमाणे ही परिषद कोविडचा प्रोटोकॉल पाळून मर्यादित स्वरूपात होणार आहे. या परिषदेला पनवेल, उरण विभागातील प्रमुख कार्यकर्ते व विमानतळबाधित 27 गावचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे कृती समितीतर्फे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या मोठ्या स्वरूपाच्या लाटेमुळे परिषदेचे स्वरूप बदलण्यात आले असले तरी गुरुवारी सकाळी 11 वाजता एकाच वेळेला ‘दिबां’ची जयंती आपापल्या गावांमध्ये, विभागांमध्ये साजरी होईल. त्यानंतर प्रमुख कार्यकर्ते कोल्ही कोपर येथे येतील असे ठरले आहे, तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर होणार्या बैठकीत भूमिपुत्रांच्या बाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कृती समिती आणि पोलीस प्रशासन यांची बैठक पार पडली. पोलिसांनी या प्रश्नासंबंधी सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर 20 जानेवारीपूर्वी बैठक घेण्याचे आश्वासित केले.
Check Also
पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …
RamPrahar – The Panvel Daily Paper