Breaking News

कळंबुसरेत शेकापला धक्का

ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील भाजपत

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील शेकापचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपक भिकाजी पाटील यांनी शनिवारी (दि. 12) भाजपत प्रवेश  केला व उरण विधानसभा उमेदवार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष शहनाज मुकादम, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सरचिटणीस रेय्यान तुंगेकर, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुधीर घरत, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष दीपक भोईर, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर तांडेल, देवेंद्र पाटील, रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस रय्यान तुंगेकर, उरण तालुका युवक संघटनेचे चिटणीस मुकेश म्हात्रे, जसिम गॅस, हितेश शहा, आशिक, मनन पटेल, सरजील कादरी, जितेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, शशी पाटील, कुलदीप नाईक, मुकुंद गावंड, प्रवीण घासे, सुनील केणी, राजेश पाटील, विजय पाटील, कमलाकर गावंड, रूपेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply