उरण : वार्ताहर : शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे पदाधिकारी योगेश रामदास कदम यांनी उरण तालुक्यात शनिवारी (दि. 27) अनेक शिवसैनिकांची भेट घेतली आणि महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी तालुक्यातील म्हातवली-नागाव गावात असलेल्या शिवसेना शाखेत जाऊन सदिच्छा भेट दिली. शिवसेनेचे पश्चिम विभाग प्रमुख एस. के. पुरो यांनी योगेश कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी शिवसेनेचे पश्चिम विभागप्रमुख एस. के. पुरा, उपविभागप्रमुख रवींद्र पडते, म्हातवली शाखाप्रमुख विष्णू पाटील, नागाव शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, अमित नाईक, संतोष लवेकर, उपशाखाप्रमुख भरत थळी, माजी शाखाप्रमुख शेखर पडते, भाजप म्हातवली गाव अध्यक्ष अभय घरत, भाजप कार्यकर्ते समीर कुथ, जगदीश म्हात्रे, उपसरपंच नागाव मोहन काठे, ग्रामपंचायत सदस्य केशव भोईर, नाना गायकवाड, सुनील फेगडे आदी उपस्थित होते.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …