पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर विश्वास असून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात आलेले आहे. त्याचप्रमाणे २२ राज्यांमध्ये सेवेचे कार्य जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे चालू आहे. भारतीय लोकशाहीतील ही दुर्मीळ बाब आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी (दि.१३) येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशाच्या विकासाला नवी दिशा देत सर्वसमावेशक प्रगती, आत्मनिर्भर भारत, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती, सामाजिक कल्याण, जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यासाठी पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात झालेल्या ऐतिहासिक विकासकामांचा आणि विविध जनकल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला.
पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, खोपोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, राजेश भगत, महिला मोर्चाचा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांमध्ये देशाने घेतलेली गरुडझेप आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेल्या शासकीय योजनांचा लेखाजोखा मंत्री ॲड. शेलार यांनी मांडला.
दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात मंत्रीमहोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रवी भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Check Also
‘जनसेवेचे अमृतपर्व’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन
मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper