Breaking News

रामशेठ ठाकूर विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 18) 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास प्राचार्या दूर्गादेवी मौर्या यांचे मार्गदर्शन लाभले़ त्याचप्रमाणे हा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा, म्हणून पर्यावेक्षिका वीणा मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्सचे प्राचार्य डॉ. मराठे आणि न्यू इंग्लिश स्कूल, ओवेपेठ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विदयालय, खारघरचे शाळा समिती सदस्य प्रभाकर जोशी यांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. गडदे यांचे सहकार्य लाभले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply