Breaking News

आदिवासींच्या जमिनीवर धनदांडग्याचा डोळा

कवडीमोल भावाने जमिनी लाटण्याच्या प्रकारात वाढ

पाली : प्रतिनिधी

आपल्या उंबरे गावानजीक असलेल्या जमिनीवर एका धनिकाने अतिक्रमण करून जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम असून सबंधित व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार जनी गौरू पवार यांनी खालापूर तहसीलदार व पोलीस ठाण्यात केली आहे.

पाली-खोपोली मार्गालगत उंबरे गावाजवळ जनी पवार (रा. घोडपापड आदिवासीवाडी, ता. सुधागड) आणि परिवाराची सर्वे क्रमांक 35 अ ही एक एकर 35 गुंठे क्षेत्र असलेली सामाईक जमीन असून या शेतजमिनीवर हे आदिवासी कुटुंब नाचणी, वरी तसेच भात पिकांचे उत्पादन घेतात. जागेत आंब्यांच्या कलमांची लागवड करण्यात आली होती.

एका धनिकाने 14 जानेवारीच्या रात्री या जमिनीवर जेसीबी लावून खोदकाम केले. तसेच आंब्याची 12 कलमेदेखील नष्ट केली. शेताचे बांध फोडून संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त केली असल्याचे जनी पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

आमच्या जागेत रातोरात जेसीपी लावून बांधकाम व झाडे तोडून टाकली आहेत. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहन करू.

-रमेश पवार, जमीन मालक

जनी पवार यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमून वस्तूस्थिती जाणून घेऊ. चौकशी अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  कोणत्याही आदिवासी बांधवांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ.

-आयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply