पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील वढाव ग्रुपग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मानांकन संस्थेचे मुख्य लेखापाल किरण भगत यांच्या हस्ते वढाव संरपच पूजा पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, ग्रामसेवक कुंभार यांनी हे प्रशस्तीपत्र स्वीकारले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेश वर्तक, पोलीस पाटील कविता म्हात्रे, समाजसेवक अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दप्तर मांडणी, बैठक व्यवस्था, अद्यायावत फलक, अग्निशामक सुरक्षा, सेफ्टी टँक, बायोमेट्रिक मशीन, स्वच्छ परिसर या सर्वांची पूर्तता केल्याने वढाव ग्रुपग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पेण तालुक्यातील एकूण 65 ग्रामपंचायती असून आयएसओ मानांकन मिळवणारी वढाव ही तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. या पुर्वी तालुक्यातील सावरसई, वडखळ, वाशी, वढाव या ग्रामपंचायतींनी मानांकन प्राप्त केले आहे.