खोपोलीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍याला कोठडी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

आईस्क्रीमचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणार्‍या ऊमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन (वय 37, रा. शिळफाटा खोपाली, ता. खालापूर) याला खालापूर न्यायायलाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी ऊमेदभाई आणि पीडित अकरा वर्षे व नऊ वर्षीय मुली पटेलनगर नॅशनल गॅरेज शिळफाटा खोपाली येथे एकाच गल्लीमध्ये समोरासमोर राहण्यास आहेत. ऊमेदभाई याने पीडित मुलींना आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने घरात नेऊन आतमधून दरवाजाची कडी लावून घेतली. पीडित मुलींच्या सोबत अश्लील वर्तन केले. सदर प्रकार कोणाला सांगितला तर मार पडेल अशी धमकी ऊमेदभाईने त्यांना दिली. त्यामुळे भीती पोटी मुलींनी सदरचा प्रकार घरात सांगितला नाही. परंतु मुलींच्या वागण्यातील फरक ओळखून मुलींच्या आईने विश्वासात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलींच्या पालकांनी थेट खोपोली पोलीस ठाणे गाठत ऊमेदभाई हरिजन विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने आरोपी याला अटक केली. या प्रकरणी ऊमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन विरोधात भादंविक 376अब, 341, 506, बाल लैगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अधिनियम, 2012 चे कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरिक्षक हरिश काळसेकर करीत आहेत.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply