Breaking News

रसायनी परिसरात शांततेत मतदान

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी परिसरात शांततेत मतदान झाले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंदाजे 55 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडावी यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद झाल्याने येणार्‍या 23 मे रोजी मावळच्या विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply