Breaking News

प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांवर आज सुनावणी

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022ची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे 1 ते 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार 3852 हरकती व सूचना पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या 3 फेब्रुवारी रोजीच्या आदेशानुसार बुधवारी (दि. 17) सुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे. ही सुनावणी घेण्यासाठ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. ते विभागीय आयुक्त, कोकण विभाग व जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा यांच्या उपस्थितीत नागरिकांनी सादर केलेल्या हरकती व सूचनांवर सकाळी 9 वाजल्यापासून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या तिसरा मजला येथील ज्ञानकेंद्र येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. विभाग कार्यालयामार्फत सदर सुनावणीकरिता हजर राहण्यासाठी संबंधितांना सूचनापत्र देण्यात येत आहे. हरकत व सूचनाधारकांनी सूचनापत्रात नमूद केलेल्या वेळेच्या 15 मिनिटे आधी आपले प्राप्त झालेले सूचनापत्र, हरकती व सूचनांसह सुनावणीकरिता उपस्थित रहावयाचे आहे. फक्त हरकती व सूचनाधारकास सुनावणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावयाची आहे. जे हरकती व सूचनाधारक त्यांना दिलेल्या निश्चित वेळेस उपस्थित राहणार नाहीत किंवा गैरहजर राहतील त्यांची हरकत व सूचना एकतर्फी निकाली काढण्यात येईल, याची नोंद घ्यावयाची आहे. कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सर्वांनी काळजी घ्यावयाची आहे. सर्व हरकती व सूचनाधारकांनी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटे आधी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त व निवडणूक अधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply