Breaking News

महाडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा

महाड : प्रतिनिधी

विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाने बुधवारी महाडमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यांत आला.

महाराष्ट्र दिनानिमित्त महाडमधील चांदे क्रिडांगणावर आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी  पोलिसांतर्फे मानवंदना देण्यांत आली. या कार्यक्रमाला उप विभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, उप विभागीय पोलीस अधिकारी पाटील,  तहसिलदार इंद्रसेन पवार, नायब तहसिलदार प्रदिप कुडळ, रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेट, महाड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माधव मुंदडा, प्रकाश माणिकचंद मेहता, नगरसेवक दिपक सावंत, चेतन पोटफोडे, पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे यांच्यासह महाड तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. किल्ले रायगडावरदेखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. तेथे  नायब तहसिलदार अरविंद घेमुड त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. येथील युवा शिंपी समाज उत्कर्ष मंडळ आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी चौकातील जनकल्याण रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.   रंगसुगंध या संस्थे तर्फे लहान मुलांकरीत पुस्तक बाग हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याची सांगता आज करण्यांत आली.   चवदारतळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या प्रांगणामध्ये रंगसुगंध, जल्लोश 2019 हा कार्यक्रम सादर करण्यांत आला. तसेच चवदारतळे मित्र मंडळाच्या वतिने खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या खाद्यजत्रेला खवय्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply