Breaking News

कर्नाळा बँकेवर प्रशासक

आठवड्यातच ठोस कारवाई करणार -पोलीस आयुक्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचारानंतर शासनाने बँकेवर प्रशासक अधिकार्‍याची नेमणूक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 9) माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेऊन घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कर्नाळा बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन प्रशासक अधिकार्‍यांची भेट घेतली. या वेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बँकेच्या कर्मचार्‍यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे जवळपास 62 हजार ठेवीरादारांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. अलीकडील काळात संसदेत पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त झाल्यामुळे आपण पाच लाखांपर्यंत ठेवीचा विमा हप्ता तत्काळ विमा कंपनीस भरून त्याचा लाभ कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना मिळेल यादृष्टीने दक्षता घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून विमा हप्ता, डिपॉझिट इश्युरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला भरून त्याबद्दलची माहिती आम्हाला तत्काळ कळवावी, अशा आशयाचे निवेदन या संपूर्ण प्रकरणावर नेमण्यात आलेल्या प्रशासकांची भेट घेऊन देण्यात आले. यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘राम प्रहर’ला अधिक माहिती दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply