पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वर्गीय एस. आर. जोशी स्मृतिदिनानिमित्त अॅड. सुनीता जोशी संपादित आठवणीतलं पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी (दि. 26) झाला. या पुस्तकाचे डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला.
स्वर्गीय एस. आर. जोशी मेमोरियल या ट्रस्टमार्फत ‘आठवणीतलं पनवेल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी झाला. या ट्रस्ट तर्फे गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपून पनवेल परिसरात सेवाभावी कार्य केले जात आहे. या कार्यक्रमाची सुरुवात स्वराली संगीत विद्यालयाच्या बालकलाकार मंडळींनी पोवाडा सादर करून केली.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमाल, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, प्रकाशक अशोकसाई खरात, ज्येष्ठ सहकारी दत्तात्रय जाधव, सुनील देसाई, डॉ. भक्तीकुमार दवे, डॉ. संजीवनी गुणे, पुस्तकाच्या संपादीका अॅड. सुनीता जोशी, उज्वला पटवर्धन, ट्रस्टी माधवराव जोशी, संतोस घोडींदे, गौरीताई बापट, अत्रे आदी उपस्थित होते.