सरपंच कमला देशेकर यांचे प्रयत्न
कळंबोली : वार्ताहर
सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या दूरदृष्टीतून चिंध्रण गावातील संडपाण्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे. त्यामुळे गावातील साथीच्या रोगांना आळा बसणार आहे. यामुळे गावातील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण असून त्यांनी सरपंच कमला देशेकर यांचे अभिनंदन केले आहे.
सांडपाण्यामुळे सर्वत्र पाणीच पसरत असून डासांचा उपद्रव वाढून साथीचे रोग होत आहेत. या सर्वावर कायमचा उपाय म्हणून सरपंच कमला देशकर यांनी गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत करण्याचा संकल्प करून तो ग्रामपंचायतीच्या आर्थिक निधीतून साकारण्यात येत आहे. यासाठी गावातील जेथे सांडपाणी जमा होते, त्या ठिकाणी टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्या टाक्यात गावातून निघणारा सांडपाणी साठविण्यात येऊन त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या निकालात निघून रोग्याच्या साथीवर मात करता येईल.
या अत्याधुनिक प्रकल्पाचे चिंध्रण व परिसरातील गावातील नागरिकांनी स्वागत केले असून महिलावर्गातून समाधान व्यक्त केला जात आहे. चिंध्रण गावात विविध योजनांच्या माध्यमातून सुविधा देण्यात येऊन सरपंच कमला देशेकर यांनी गावापुढे एक आदर्श ठेवला आहे.