Breaking News

कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांना निरोप

कर्जत : प्रतिनिधी

येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांची रसायनी पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यांना कर्जतमधील पोलीस कर्मचार्‍यांच्या वतीने निरोप देण्यात आला. सुजाता तानवडे यांनी 30 मार्च 2017 रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याअगोदर त्या पुणे येथे सीबीआयमध्ये कार्यरत होत्या. कर्जत पोलीस ठाण्याच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षकपदाचा मान त्यांना मिळाला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची रसायनी पोलीस ठाण्यात बदली झाली. कर्जत पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शनिवारी (दि. 27) त्यांना निरोप दिला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply