Breaking News

बारावी परीक्षेच्या भीतीने रोह्यात तरुणाची आत्महत्या

धाटाव : प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेला शुक्रवारी (दि. 4) राज्यात सुरुवात झाली असताना याच परीक्षेच्या भीतीने रोहे तालुक्यातील सानेगाव येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रवेश प्रकाश भांगरे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नागोठणे पिंपळगाव येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो सानेगावमध्ये राहत होता. बारावीच्या परीक्षेचा शुक्रवारी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. परीक्षेच्या भीतीने प्रवेश भांगरे या विद्यार्थ्याने सकाळी 8च्या सुमारास शाळेच्याबाहेर असलेल्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, गेली दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेत होते. ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने या दोन वर्षांत नीट शिक्षण मिळाले नाही आणि आता परीक्षा ऑफलाइन असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply