Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध

भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.16) झाले.
या वेळी गुळसुंदे जि.प. विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पनवेल तालुका उपाध्यक्ष व कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच विद्याधर जोशी, नांदगाव सरपंच मनोहर भोईर, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, पळस्पे गाव अध्यक्ष विजय गवंडी, उपसरपंच अजय तेजे, समीर केणी, सज्जन वारके, दर्शन ठोंबरे, उमेश पाटील, दीपक दुर्गे, धीरज ओवळेकर, रवी शेळके, ग्रामसेवक समीर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply