Monday , June 5 2023
Breaking News

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी

वडखळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल

पेण : प्रतिनिधी

कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वडखळ येथील एल अ‍ॅण्ड टी कॉलनी घडली असून, या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  फिर्यादी (रा. एल अ‍ॅण्ड टी कॉलनी, ब्लॉक पी, वडखळ) हे त्यांच्या रूममध्ये कामगारांसह जेवत असताना त्यांच्या ताटात  पहिल्या मजल्यावरील ब्लॉक (नंबर पी 10) च्या फटीतून कचरा पडला. त्याबाबत फिर्यादी व त्याचे सहकारी कामगार ब्लॉक नंबर पी 10मधील कामगारांना सांगत असताना शेजारील रूममधील 4 आरोपींना राग येवून त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच दगडफेक करून रूमच्या काचा फोडल्या.  याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी तक्रारीनुसार रा. एल अ‍ॅण्ड टी कॉलनीमधील ब्लॉक नंबर पी-8, आणि पी-10 या रूम समोर बाचाबाची चालू असल्याचा आवाज आला. म्हणून फिर्यादी व साक्षीदार यांनी बाचाबाची करणार्‍या कामगारांना येथे भांडण करू नका, असे सांगितले. यानंतर रूम नंबर पी-1 मधील 4 आरोपी फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करीत जिन्याने खाली उतरले. त्यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपींना तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करता, असे विचारले. त्याचा राग येवून त्यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण केली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे  करीत आहेत.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply