Breaking News

नवीन पनवेल येथे डोळे तपासणी शिबिराला प्रतिसाद

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती; लाभार्थ्यांना चष्म्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’ सभापती अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

नवीन पनवेल सेक्टर 14 येथील के. आ. बांठिया शाळा येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आलेल्या नागरिकांची मोफत डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल येथील जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद भगवान वाघमारे, जय बजरंग महिला मंडळ, आई माऊली मित्रमंडळ आणि इतर मित्रपरिवार यांनी केले होते.

कार्यक्रमांना उपस्थित महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका चारूशिला घरत, राजश्री वावेकर, दर्शना भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, प्रभाग क्रमांक 17 वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, विनोद वाघमारे, पप्पू साळवी, रतन नेमाडे, किशोर वाढवे, जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, योगेश हांडगे, राजेंद्र घरत, जनार्दन थळी, राजाराम शिंदे, सदाशिव कुमकर, रूपेश सरदार, प्रकाश रिसबूड, प्रशांत पाटील, प्रेम डुकरे, राजेंद्र ठोकळ, राजू गायकवाड, किशोर कारंडे, भालचंद्र वाघमारे, अभिनय म्हात्रे, नीरज चौरसिया, हेमांगी विनोद वाघमारे, मयुरी उनटकट, भारती घरत, प्राजक्ता वाघमारे व आई माऊली मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply