Breaking News

नवी मुंबईतील गौरी, शर्वरी युक्रेनमधून सुखरूप परतल्या

नवी मुंबई ः बातमीदार

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील भीषण युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. नवी मुंबईतील सीवूडमध्ये राहणारी गौरी प्रभू आणि सानपाड्यात राहणारी शर्वरी कदम या दोघीही सुखरूप भारतात परतल्याने तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.विविध देशांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जात असतात. सध्या रशियाने युक्रेनवर युद्ध पुकारले असल्याने प्रत्येक देश आपापल्या विद्यार्थ्यांना तेथूून सोडवून घरी पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. या अंतर्गत युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेली सीवूड्स दारावे सेक्टर 23 येथील गौरी प्रभू ही विद्यार्थिनी सुरक्षित आपल्या घरी पोहचली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रणजित नाईक यांनी गौरीचे स्वागत केले. या वेळी भाजपचे पदाधिकारी सतिश निकम, कुणाल महाडिक, जयेश थोरवे हेही उपस्थित होते, तर भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप व सतीश निकम यांनी शर्वरीचे स्वागत केले. या वेळी श्रीमंत जगताप, शशी नायर, दिलीप पाटील, बाळासाहेब हांडे आदी उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply