Breaking News

सीकेटी महाविद्यालयात ‘उड्डाण’ महोत्सव उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘उड्डाण’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2021-2022 करिता उड्डाण महोत्सवाचे नवी मुंबई विभागीय यजमानपद जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने भूषविले. हा महोत्सव 8 ते 10 मार्च दरम्यान उत्साहात पार पडला.

उड्डाण महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 8) झाले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रभारी संचालक सुधीर पुराणिक, उड्डाण महोत्सवाचे आयोजक

प्रो. डॉ. कुणाल जाधव आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या महोत्सवास मुंबई विद्यापीठा अंतर्गत 25 महविद्यालयातील 400 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. भित्तीपत्रिका स्पर्धेत प्रथम एच.बी.बी.एड.कॉलेज वाशी, द्वितीय अंजुमन-ई-इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस पनवेल, तृतीय जे. व्ही. एम. डिग्री कॉलेज, ऐरोली यांनी पटकावला.

सर्जनशील लेखनात प्रथम सानपाडा कॉलेज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नोलॉजी, द्वितीय अंजुमन-ई-इस्लाम अकबर पिरबोय कॉलेज ऑफ एजुकेशन वाशी, तृतीय डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ लॉ नेरूळ यांनी मिळवला. लघुपट स्पर्धेत प्रथम अंजुमन-ई-इस्लाम अकबर पिरबोय कॉलेज ऑफ एज्युकेशन वाशी, द्वितीय वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिजनेस मॅनेजमेंट सानपाडा, तृतीय रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स खारघर यांनी पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी बेलापूर, द्वितीय जे.व्ही.एम.डिग्री कॉलेज ऐरोली, तृतीय एस.आय.ई.एस.कॉलेज नेरूळ, पोवाडा गायन स्पर्धेत प्रथम डी. जी. तटकरे महाविद्यालय माणगाव, द्वितीय वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिजनेस मॅनेजमेंट सानपाडा, शेतकरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड कॉमर्स घणसोली यांनी मिळवला.

सीकेटी महाविद्यालयाच्या चमूने मुंबई विभागीय उड्डाण महोत्सवात वक्तृत्व, भित्तीपत्रिका आणि पोवाडा गायन स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. उड्डाण महोत्सवासारख्या नावीन्यपूर्ण, विद्यार्थी केंद्रित महोत्सवामाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थ्येचे सचिव डॉ. एस. टी.गडदे यांनी कौतुक केले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply