Breaking News

मद्यविक्रीला खारघरमध्ये विरोध; नागरिकांनी पाळला कडकडीत बंद

पनवेल ः नो लिकर झोन असलेल्या खारघरमधील बारचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रविवारी (दि. 27) शहरात बंद पाळण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बंदमध्ये व्यापारी, रिक्षाचालकांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दारूमुक्त खारघरसाठी भाजपसह सर्व राजकीय पक्ष, संस्था-संघटना आणि नागरिकांच्या वतीने रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. खारघरमध्ये मद्यविक्रीला परवानगी नकोच, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली. खारघर हे एक सुसज्ज शहर म्हणून ओळखले जाते. येथील लोक सुशिक्षित व शांतताप्रिय आहेत, मात्र या शहरात सुरू झालेल्या हॉटेल निरसुख पॅलेसला बारचा परवाना मिळाल्यामुळे येथील संस्कृतीला धक्का बसला आहे. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही परवानगी मिळाल्याचे समोर आले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वेळी त्यांनी दारूमुक्तीच्या घोषणा दिल्या. बंदमध्ये सर्वपक्षीय उपस्थित होते. भाजपकडून खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, विजय पाटील, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, व्यापारी सेल संयोजक राजेंद्र मांजरेकर, उपाध्यक्ष बीना गोगरी, महिला सरचिटणीस साधना पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply