आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील महिला बचत गट आणि महिला स्वयंसहाय्यता गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेद सखी मंचच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला अनेकांनी भेटी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत उद्योजक आणि महिला बचत गटांना व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चा (उमेद सखी मंच) तर्फे कर्जतमधील रॉयल गार्डन येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष उमा खापरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले, या वेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलम गोंधळी, रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील आणि जेएम पोर्टलच्या प्रदेश प्रमुख वर्षा डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, कर्जत शहर अध्यक्ष सरस्वती चौधरी, तालुका उपाध्यक्ष स्वामींनी मांजरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात कर्जत तालुक्यातील 35 महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला अलिबाग येथील कमळ पतसंस्था, कर्जत येथील मैत्रीण साडी, राधिका इन्फ्रा प्रोजेक्ट, वैद्य फर्निचर, दगडे वडेवाले, फिनो बँक, पार्थ अँडवटाझिंक, इंदू बिल्डिंग सिस्टीम, ज्ञानसाधना क्लासेस, बाबा इंटरनॅशनल स्कूल यांनी अर्थसहाय्य केले. या वेळी सहभाग घेतलेल्या उद्योजकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणयात आला. महिलांसाठी लकी ड्रॉ व पैठणीचा खेळही ठेवण्यात आला होता.
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक गिरीश तुळपुळे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष संध्याताई शालबिंद्रे, कर्जत तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, तालुका सरचिटणीस वर्षा बोराडे, नेरळ शहर अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, नेरळ ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे, तसेच शर्वरी कांबळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी, किरण ठाकरे, कर्जत तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, मंदार मेहंदळे यांच्यासह अनेकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.