माणगाव : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सरशी झाल्यामुळे माणगावात भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.
पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यात उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. गोव्यामध्येही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. निकाल जाहीर होताच माणगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटले तसेच फटक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, नीलम काळे, नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती राजेश मेहता, माजी उपसरपंच नितीन दसवते, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने, तालुकाध्यक्ष विशाल गलांडे, खजिनदार संजय जाधव, विकास पवार, रमेश शिंदे, कृष्णा भोसले, दहिवली कोंड ग्रामपंचायत सदस्य योगेश पालकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.