Breaking News

प्रभाग 19 मधील पाईपलाईनचे काम लवकरच सुरू

नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 19 येथे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झज्ञली असल्याने परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत नव्हा. याबाबत नगरसेविका रुचिता लोंढे यांनी पाण्याची लाईन बदलून मिळावी यासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने लवकरच ही पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरसेविका रुचिता लोंढे यांचे आभार मानले आहेत.

महापालिका क्षेत्राातील प्रभाग 19 येथील राम गणेश गडकरी मार्ग, महात्मा फुले मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग येथील भाग हा जुन्या वाड्यांचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र कालांतराने येथील वाड्यांचे रूपांतर मोठ्या सोसायटींमध्ये झाले. वाड्यांपुरता मर्यादित पाणी पुरवठा लक्षात घेता, अंडरग्राउंड पाण्याच्या लाईनची व्यवस्था होती. परंतु, शहरीकरण व वाढती लोकसंख्या लक्षात घेता, परिसराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. तसेच पाईपलाईन जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी गळतीही होत होती. त्यामुळे ही पाण्याची लाईन बदलून मिळावी, प्रभागातील भाजपच्या नगरसेविका रुचिता लोंढे यांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका अधिकारी चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरवठा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सोमवारी (दि.16) पाणी विभाग अधिकारी तायडे, पाटील यांनी मोजणी केली असून लवकरच नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती नगरसेविका रुचिता लोंढे यांनी दिली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply