Breaking News

मुरूडमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी

ग्राहकांमध्ये हक्क आणि कर्तव्याबद्दलची जागरूकता वृध्दींगत करण्यासाठी ग्राहक दिन साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन मुरूडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी मंगळवारी (दि. 15) येथे केले.

जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तहसीलदार शिंदे बोलत होते. या वेळी एनएसएस विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन केले तरच पर्यावरणाचे संरक्षण होवू शकेल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

मुरूडचे नायब तहसीलदार गोविंद कोटंबेे, पुरवठा अव्वल कारकून आर. नाखवा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्रीशैल बहिरगुंडे, अ‍ॅड. इस्माईल घोले, माजी उपनगराध्यक्ष अतिक खतिब, डॉ. मधुकर वेदपाठक, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. नारायण बागुल, डॉ. देविदास रौदळ, कृषि अधिकारी विश्वजीत अहिरे, सचिन राजे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात चिंच, आंबा, फणस, पेरू व इतर झाडांची लागवड करण्यात आली.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply