नवी दिल्ली : 14व्या भारत-जपान शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी (दि. 19) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फुमियो किशिदा यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. ही बैठक भारत आणि जपान यांच्यात भागीदारी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …