माणगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली हायस्कूलमध्ये इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सत्कार समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांनी भूषविले. या कार्यक्रमास संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक पारकर, संस्थचे सहकार्यवाह दिलीप उभारे, संस्थेचे खजिनदार विनायक साबळे, सदस्य चंद्रकांत उभारे, पांडुरंग उभारे, पानावकर, यशवंत बक्कम, अनिल बेंदुगडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे संस्थचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने तसेच रायगड भूषण पुरस्कार 2022 चे मानकरी संस्थेचे सहकार्यवाह शिक्षक दिलीप उभारे यांना विघवली विभाग शिक्षकांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.