Breaking News

उतेखोल गावच्या लेकींनी आणली रायगड किल्ल्यावरून शिवज्योत

माणगाव : प्रतिनिधी

उतेखोल गावातील काही तरुणींनी शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि. 21) किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली. शिवजयंती निमित्ताने गावोगावच्या तरुणांनी किल्ले रायगडहून शिवज्योत आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु तरुणींनी आपल्या गावात शिवज्योत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण माणगाव तालुक्यात उतेखोल गावच्या तरुणींचे विशेष कौतुक होत आहे. उतेखोल गावातील दीपाली मढवी, स्वाती जाधव, आदिती जाधव, दिव्या मढवी, दिक्षा मढवी, राजश्री मढवी, पुर्वा शिर्के, प्रांजल चव्हाण, कल्याणी चव्हाण, तन्वी चव्हाण, आचक लांगे, प्रिया जोरकर, रिध्दी मढवी, आकांक्षा जाधव, वैष्णवी जाधव आदी तरुणींनी शिवजयंती निमित्ताने किल्ले रायगड येथून उतेखोल गावात शिवज्योत आणली. सोमवारी (दि. 21) नगरसेविका ममता थोरे यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. या वेळ पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे, उतेखोल ग्रामस्थ राकेश जाधव, रमेश मढवी, निलेश थोरे, आकाश मढवी, बाबू चव्हाण, अनिकेत लांगे, नितेश जोरकर, सुशिल जठार, ऋषी जाधव, सागर जठार, सागर जोरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply