माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोर्बा विभाग यांच्या सौजन्याने सचिन इलेव्हन क्रिकेट क्लब निळगुणच्या वतीने कै. सचिन गुगळे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराणा प्रताप नगर माणगाव संघाने अंतिम सामन्यात खालची वाडी डोंगरोली संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला.
माणगाव निळगुण फाटा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक खालची वाडी डोंगरोली संघाने, तृतीय आमडोशी संघाने, तर चतुर्थ क्रमांक नवघर संघाने मिळविला. वैयक्तिक बक्षिसांमध्ये मालिकावीर दीपक पवार (माणगाव), उत्कृष्ट फलंदाज बाळाराम डोंगरे (डोंगरोली), उत्कृष्ट गोलंदाज अर्जुन पवार (माणगाव) यांची निवड करून
त्यांनाही पारितोषिक देण्यात आले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …