Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून दुंदरेपाड्यात पाण्याच्या टाकीची उभारणी

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात सातत्याने विकासकामे केली जात असून दुंदरेपाड्यात 16 लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले.
या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच अनुराधा वाघमारे, शांताराम चौधरी, नारायण चौधरी, दिलीप उलवेकर, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार राठोड यांच्यासह गुलाब चौधरी, भाऊ चौधरी, विष्णू चौधरी, श्याम चौधरी, गोविंद खारूटकर, सर्व्हेश चौधरी, संतोष करमेळकर, तुकाराम चौधरी, बगाराम चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply