Breaking News

कर्जत चारफाटा ते भिसेगाव रस्त्याच्या कामाची पाहणी

कर्जत ः बातमीदार

कर्जत येथील चारफाटा ते भिसेगाव या भागातील रस्त्याचे काम गेले अनेक महिने सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून त्या कामाची पाहणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

कर्जत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. हा रस्ता व्हावा अशी भिसेगावमधील नागरिकांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी नगर परिषदे शी पत्रव्यवहार केला होता. याबाबत उपोषणही करण्यात आले होते. तांत्रिक कारणामुळे रस्त्याचे काम रखडले होते. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर एमएमआरडीएमार्फत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी सुमारे पाच कोटी इतका निधी कर्जत नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला होता. त्या अनुषंगाने रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीत असलेल्या चारफाटा ते भिसेगाव (न्यू बिकानेर) या 600 मीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून त्याची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि शहर अभियंता मनीष गायकवाड यांनी केली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply