खालापूर : रामप्रहर वृत्त
वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे दुपारी 12 वाजता जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पेणचे आमदार रविशेठ पाटील, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.चे एमडी राजेश शर्मा, विश्वस्त बेनी प्रसाद राऊका, सीएसआर नीता जोशी, राहूल रसाळ, जि.प.च्या माजी सदस्य पद्मा पाटील, पं. स. सदस्य चंद्रकांत कातकरी, वडगाव-वाशिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी गडगे, उपसरपंच सुजाता पाटील, सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या वेळी वधू-वरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब. सहपरिवार उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांत अध्यक्ष ठमाताई पवार यांनी केले आहे.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper