पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई गोवा महामार्गावरील तारा या गावाजवळ शिवज हे प्युअर वेज हे हॉटेल सुरू झाले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले.
भाजपचे बुथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीपशेठ जेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून, या हॉटेलचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी जितेंद्र म्हात्रे आणि जितेंद्रशेठ जेना यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवज या हॉटलेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष परशुराम जितेकर, माजी नगरसेविका नीता माळी, यांच्यासह कर्नाळा विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते तसेच या हॉटेलला उरणचे आमदार महेश बालदी यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …