कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चार दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता रविवारी (दि. 27) झाली. या महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद घेता आला. या महोत्सवाच्या समरोपावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ठरित्या आयोजित या महोत्सवाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी आणि युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कामोठे पोलीस स्थेशन समोरील मैदानात 24 ते 27 मार्च दरम्यान भव्य मिसळ महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात कामोठेकरांना तसेच परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद मिळाला. या महोत्सवाची सांगता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी झाली.
या वेळी पनवेल महापालिकेेच्या प्रभाग समिती ‘क’च्या सभापती सभापती अरुणा भगत, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, समाजसेवक प्रदीप भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, जितू काटकर, सुशील शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, शिख समाजाचे अध्यक्ष जसपाल सिंग सिंधु, हरविंदर कौर, पनवेल गुरुद्वारा अध्यक्ष सोनु सिंग, रश्मी भारद्वाज, साधना आचार्य आदी उपस्थित होते.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper