Breaking News

पंतप्रधान मोदींच्या परीक्षे पे चर्चा कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी  परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामधून मुलांनी परीक्षेचा मनावर कोणताही ताण न घेता परीक्षा उत्सवासारखी साजरी करून परीक्षा योध्दा बनावे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जवळ 1 एप्रिल रोजी संवाद साधणार आहेत.  त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन ओएनजीसी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सोहन लाल यांनी केले आहे.

पनवेलच्या ओएनजीसी केंद्रीय विद्यालयात बुधवारी (दि. 30) पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्राथमिकच्या मुख्यध्यापिका सुनीता त्रिपाठी व सर्व शिक्षक उपस्थित होते. दोन वर्षे ऑनलाइन पध्दतीने शिक्षण आणि परीक्षा झाल्यावर आता ऑफ लाईन परीक्षा होणार असल्याने मुलांच्या मनात परीक्षेबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे परीक्षेच्यावेळी मुलांच्या मनावर येणारा ताण कमी करण्यासाठी आपल्या विशेष आकर्षक शैलीत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निराकरण करणार आहेत.

पनवेलच्या ओएनजीसी केंद्रीय विद्यालयातील अमन माणियार या विद्यार्थ्याला 2019 मध्ये प्रत्यक्ष सामील होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याची अभ्यासातील रुचि वाढलेली दिसली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून या वर्षी नववी ते 12 वीतील 632 विद्यार्थी, 80 शिक्षक आणि 319 पालकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

आपला राष्ट्रीय नेता आपल्या जवळ परीक्षेबाबत बोलले याचा  विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला परिणाम होतो. त्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. विद्यार्थ्यांत चांगले बदल घडून आलेले दिसतील. या कार्यक्रमामुळे आम्हा शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळते म्हणून आम्ही शिक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल धन्यवाद देतो.

-सोहन लाल, प्राचार्य, ओएनजीसी केंद्रीय विद्यालय, पनवेल

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply