Breaking News

प्रवीण तांबे यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतेही ध्येय्य गाठता येते याचे उत्तम उदाहरण म्हाणजे प्रविण तांबे. वयाच्या 41 व्या वर्षी ज्यावेळी क्रिकेट खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयामध्ये प्रविण तांबे यांची आयपीएल खेळण्यासाठी निवड झाली. त्यांच्या संर्घषाने भरलेल्या जीवनावर आधारीत ‘कोण प्रविण तांबे’ हा चित्रपट आज शुक्रवारी (दि. 1) डिस्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. त्यांच्या या संषर्घमय जीवनाचा प्रवास पाहून आपणही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

पनवेल आणि प्रविण तांबे यांचे एक घट्ट नाते आहे. गेल्या 20 वर्षांपासून प्रविण तांबे त्यांचे पनवेलचे मित्र प्रशांत कर्पे आणि त्यांच्या संघासोबत व्यावसायिक टेनिस क्रिकेट आणि लेदर व्यावसायिक क्रिकेट पनवेल महापालिका मैदान व मिडल क्लास हाउसिंग सोसायटीच्या मैदानात खेळण्यासाठी येत होते. प्रवीण तांबे हे मुलुंड येथे राहणारे असून यांच्या जीवनावर आधारित ‘कोण प्रवीण तांबे’ हा चित्रपट पुढच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे. या चित्रपटामध्ये प्रवीण तांबे यांची भूमिका श्रेयस तळपदे यांनी साकारली आहे. प्रवीण तांबे यांनी आपल्या जीवनात प्रचंड मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास बाळगून यशाचे शीखर गाठले आहे. आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रमही प्रवीण तांबे यांच्या नावावर नोंदवला आहे. ज्या वयात क्रिकेटर्स निवृत्त होतात त्या 41 व्या वर्षी प्रवीण तांबे यांनी आयपीएल स्पर्धेमध्ये राज्यस्थान रॉयल्स संघामधून दमदार पदार्पण केलेे. तसेच 2016 मध्ये भारतामध्ये झालेल्या टी-20 इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये प्रवीण तांबे हे बेस्ट बॉलर या किताबाने सन्मानित करण्यात आले.

2018 मध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने क्रिकेट समालोचन मार्गदर्शन शिबिर मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरालाही प्रविण तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यामुळे प्रविण तांबे यांचे पनवेलकरांसोबत वेगळे नाते आहे. त्यांचे पनवेलमध्ये मोठा मित्र परिवार आहे. त्यामुळे आपल्या या जवळच्या मित्राच्या जिवणावर चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्यांच्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. याबाबात प्रांत अधिकारी राहुल मुंडके, सुखम हॉस्पिटलचे डॉ. संतोष जाधव, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अभिनेते विजय पाटकर तसेच प्रविण तांबे यांचे पनवेलचे मित्र प्रशांत कर्पे, निलेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply