नवी दिल्ली : लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक राज्यांतील बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु केंद्र सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. याविषयी केंद्राने नियमावलीही जारी केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तसे पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन लॉकडाउनच्या काळात परीक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यांना आणि इतर बोर्डांना दहावी बारावीच्या परीक्षा घेता येणार असून, काही बाबींचे पालन करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिला आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper