Breaking News

निवृत्त पोलीस कर्मचार्‍यांचा स्नेहमेळावा साजरा

नवीन पनवेल : वार्ताहर

निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना भेडसावणार्‍या समस्या मार्गी लावण्यासाठी, तसेच अगदी लहानात लहान गोष्टींचाही आनंद घ्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, असा सल्ला निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोशिएशनचे संस्थापक व मुख्य सल्लागार टी. के. चौधरी यांनी निवृत्त पोलीस कर्मचार्‍यांना शनिवारी दिला. नवी मुंबई, पनवेल येथील निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या कामोठे येथे पार पडलेल्या नवी मुंबई विभागीय मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी धनंजय जाधव, खंडेराव शिंदे, पी. टी. लोहार, रामराव घाडगे, मोहन राठोड, जयंत पाटील, जयसिंग तांबे, ह.भ.प दामाजी गणपत गोवारी विद्यालयाचे चेअरमन सूरदास गोवारी आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, पोलीस हे समाजातील प्रत्येकाच्या प्रश्नाला सामोरे जातात. अनेकांचे प्रश्न सोडवितात. तरीही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळेच त्यांनी कसे वागावे, याविषयी कोणीही सल्ला देतो, पण पोलिसांच्या चांगल्या कामाचेही जरूर कौतुक केले पाहिजे, असे आवर्जून ते म्हणाले. पोलिसांकडे गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे समाजानेही पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सूरदास गोवारी यांनीही निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम गोर्‍हे यांनी केले. या वेळी उरणचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील (गोपी), उपाध्यक्ष बाळासाहेब वाघचौरे यांची नेमणूक करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी आयलंड पिक या शिखरावर चढाई करून 20300 फूट अंतर पार करून विक्रम प्रस्थापित केला याबद्दल असोसिएशनतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले, तर आभार जयसिंह तांबे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply