हभप रामदास महाराज यांची खंत
खोपोली : प्रतिनिधी
शरिराला व्यायाम, खेळ महत्वाचे आहेत. खेळ खेळल्यामुळे शरिराला उर्जा मिळत असते. मात्र आजच्या मुलांना खेळाचा पडला असून, ती मोबाईलमध्ये गुंग असल्याचे पहावयास मिळत आहे, अशी खंत हभप रामदास महाराज पाटील यांनी माजगांव (ता. खालापूर) येथे काल्यांच्या किर्तनात व्यक्त केली. माजगाव ग्रामस्थ, वारकरी आणि महिला मंडळ यांच्या वतीने गावात अखंड हरिनाम साप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात गुरुवर्य हभप मारुती महाराज राणे (हलीवली, कर्जत) आणि हभप मधुकर महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भजन, कीर्तन, प्रवचन सुरु होते. दीपोत्सवानंतर हभप रामदास महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन झाले. आज प्रत्येकाला चिंता आणि भितीने ग्रासले आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर भगवंताचे नामस्मरण करा.यामुळे मानसिक आजार कमी होईल. असे मत त्यांनी काल्यांच्या किर्तनात व्यक्त केले. काल्याचे किर्तनाने या अखंड हरिनाम साप्ताहाची सांगता झाली. या वेळी काल्याचा महाप्रसाद वै. गंगाबाई पंढरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीकांत सुर्याजी पाटील यांनी दिला.