Breaking News

कोटगाव प्रकल्पग्रस्तांचे के्ंरद्रीय मंत्र्यांना साकडे

समस्या मार्गी लावण्यासाठी नितीन गडकरी यांना दिले निवेदन

उरण ः बातमीदार

उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरीता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आली. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 3) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले. तसेच प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष रवी भोईर, नवनीत भोईर, सुरज पाटील, कृष्णा जोशी, हेमदास गोवारी, सुनील पाटील आदी उपस्थित होते. कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरीता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आली. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकर्‍यांनी 27 नोव्हेंबर 2020पासून कोटनाका रेल्वेस्टेशन येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली. अनेकदा संप, आंदोलने झाली, मात्र शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आशा असल्याने त्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

या आहेत मागण्या  : रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात, 2013 च्या केंद्राच्या भू-संपादन कायद्याप्रमाणे बाधित शेतकर्‍यांना मोबदला मिळावा, रेल्वेस्टेशन कार्यालयात 100 टक्के भरती ही प्रकल्पग्रस्तांची करावी, रेल्वेची कामे प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावीत, हाऊसकिपींगच्या कामात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, रेल्वेस्थानक आवारातील व्यापारी दुकाने, गाळे ही सरकारी फी आकारून मालकी हक्काने किंवा भाडे तत्वावर प्रकल्पग्रस्तांना द्यावे, बाधित शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत नितीन गडकरी यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply