Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृंदा साखरेचे कौतुक

पनवेल ः वार्ताहर

नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवानिमित्त आयोजित पनवेल येथील शोभायात्रेमध्ये सात वर्षीय वृंदा मंदार साखरे हिने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रथम पारितोषिक देताना तिचे कौतुक केले. शोभायात्रेत सहभाग घेणार्‍यासांठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वयोगट 1 ते 10 मधील मुलांसाठी संत बनणे हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत वृंदा मंदार साखरे, इयत्ता दुसरी हिने सहभाग घेऊन ही संत कान्होपात्रा बनली होती. यात तिने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल तिला नववर्ष स्वागत समितीतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply