Breaking News

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजला कर्मवीर पुरस्कार जाहीर

गव्हाण कोपर : रयत शिक्षण संस्थेमार्फत उत्कृष्ट विद्यार्थी व शालेय विकासाचे मूल्यमापन करून कर्मवीर पुरस्कार देण्यात येत असतो. त्याअंतर्गत सन 2018-19चा कर्मवीर पुरस्कार गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजला जाहीर झाला आहे. त्याबद्दल रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयातील सर्व सेवकांचे पुष्पगुच्छ देऊन शुक्रवारी अभिनंदन केले. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या एस. ए. डोईफोडे, पर्यवेक्षक श्री. घाग, रयत बँकेचे संचालक पी. ए. कोळी, गुरुकुल प्रमुख रवींद्र भोईर उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply