नगरसेविका सुशीला घरत यांच्या स्वखर्चातून सुविधा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमार्फत विकासाची अनेक कामे प्रभागांमध्ये सुरू आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग समिती ‘ड’च्या माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका सुशीला घरत यांनी स्वखर्चातून नवीन पनवेलच्या ए टाईपमधील चाळींमध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसवून दिली आहे. या पाइपलाइनचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 4) झाले.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजप नेते जगदिश घरत, सेक्टर 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे, सुधाकर चौधरी, सुधाकर थवई, जनार्दन पाटील, राजेंद्र जाधव, गौरी पवार, रूपाली पाटील, पूनम पवार, राजू पाटील, मयुरी उन्नडकर, संदीप पाटील, राजू कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांनी स्वखर्चातून नवीन पनवेल ए टाईपमधील चाळ नंबर 14, 15, 33, 40 आणि 41मध्ये जलवाहिनीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नगरसेविका घरत यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये सुरू असलेल्या विकासकामांबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे कौतुक केले.