Breaking News

सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ बूथ संमेलन उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

देशात आणि राज्यात आपली सत्ता असून, विकासाची भरपूर कामे आपल्या सरकारमार्फत झाली असल्याने जनता समाधानी आहे. याउलट विरोधकांची देशात व राज्यात सत्ता नाही. त्यामुळे ते आम्ही विकासनिधी आणला असे भासवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारचे काम, योजना लोकांना पटवून देऊन त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 17) येथे केले. ते बूथ संमेलनात बोलत होते.

भारतीय जनता पक्षाच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, बूथ अध्यक्ष व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे बूथ संमेलन शनिवारी माणगाव येथील कुणबी भवन सभागृहात मोठ्या उत्साहात झाले. या वेळी जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

 या संमेलनास श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, भालचंद्र महाले, बिपीन म्हामुणकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, उपाध्यक्ष चिन्मय मोने, भाजप श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे, तळा तालुकाध्यक्ष कैलास पायगुडे, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर यांच्यासह श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजप श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात एक नंबरचा पक्ष व्हावा अशा पद्धतीचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले.

आमदार प्रवीण दरेकर आपल्या भाषणात म्हणाले की, केंद्राच्या व राज्याच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना समजावून घेऊन त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. मतदार यादीत मतदारांचे नाव समाविष्ट करावे. शिक्षणात विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करावी. गरीब, गरजू लोकांना औषधोपचाराकरिता मदत करावी. सरकारी कामांमध्ये आपल्या सत्तेचा वापर करून लोकांना मदत करावी. असे काम आपल्या कार्यकर्त्यांकडून झाल्यास याची जाणीव जनता निश्चितपणे ठेवते. संघटनात्मक रचनेसाठी पोस्टमनचे काम कार्यकर्त्यांनी करायचे आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या माध्यमातून विकास अतिशय उत्तम झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मुख्य 35 रस्त्यांची कामे, तर राष्ट्रीय पेयजल योजनेतून पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना झाल्या आहेत. विकासकामांच्या व विविध लाभांच्या योजनांमुळे भाजपला आज सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. श्रीवर्धनमध्ये आपण पकड निर्माण केली आहे. पक्षात तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते दररोज प्रवेश करीत आहेत. याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. यासाठी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे या उद्देशाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. 

या बूथ संमेलनात विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली.

या संमेलनास भाजपचे माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे, मेघना ओक, प्राजक्ता शुक्ला, यशोधरा गोडबोले, हेमा मानकर, मनोज गोगटे, सुरेंद्र साळी, नितीन दसवते, मंगेश म्हशीलकर, आरती मांजरेकर, धनश्री बापट, मीना टिंगरे, शर्मिला सत्वे, ज्योती सनील कुमार, मनीषा श्रीवर्धनकर, शैलेश खापणकर, राकेश पवार, मंगेश मुंढे, राजू मुंढे, म्हसळा सरचिटणीस तुकाराम पाटील, प्रकाश रायकर, मंगेश शिगवण यांच्यासह युवा मोर्चा, महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply